Pune : एमएमसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेजमध्ये (Pune ) तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्रासातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
राज रावसाहेब गर्जे (वय 22, रा. गोखलेनगर, मुळ रा. पाटसरा ता. आष्टी, जि. बिड) असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निरूपम जोशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : 43 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आव्हानात्मक व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राज याचे वडील रावसाहेब गर्जे यांनी तक्रार दिली आहे. राज याच्या मध्यस्थीने जोशी याला काही पैसे उसने घेऊन दिले होते. परंतु, ते पैसे जोशी परत देत नव्हता. त्यामुळे तो मानसिक तणावात आला होता. या तणावातून राजने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. परंतु, पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी  (Pune ) करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.