Pune -पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज – पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकाने आज मंगळवारी (दि.11) सेनापती बापट रोड येथील जे डब्लू मॅरिएट हॉटेलच्या चौकात रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी एका 22 वर्षीय विदयार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

चंद्रकांत माणिक रासकर( वय 38) असे लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलीस नाईकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,
सेनापती बापट रोड येथील जे डब्लू मॅरिएट हॉटेलच्या  चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी चंद्रकांत रासकर यांनी यातील तक्रारदार तरुणास त्याचे ड्राइविंग लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी आज 500 रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानंतर ताडजोडीअंती 400 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.