Pune : ऊर्जा संवर्धनाला पुरक सौर प्रकल्पांना आणखी गती द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

एमपीसी न्यूज – पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जेचे (Pune) लघु व उच्चदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीमध्ये आतापर्यंत 286 मेगावॅट क्षमतेचे 12 हजार 397 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. वीजग्राहकांचा सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) आणखी तत्पर सेवा देण्यात यावी, असे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त रास्तापेठ येथील सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय सभागृहात मंडल, विभाग व उपविभाग कार्यालयात छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणाऱ्या 97 अभियंत्यांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी मुख्य अभियंता पवार बोलत होते. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील, व्याख्याते डॉ. नीलेश रोहणकर, डॉ. संतोष पाटणी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेण्यात आली.

Hinjawadi : हॉटेल व्यवसायाच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, पारंपरिक वीजनिर्मितीचे प्रामुख्याने (Pune) कोळसा, वायू व इतर इंधन साठे मर्यादित झाले आहेत. संपुष्टात येणाऱ्या या नैसर्गिक इंधनामुळे ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देणे अतिशय महत्वाचे आहे. पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वेग देण्यात आला आहे. छतावरील सौर प्रकल्प उभारणीसाठी ग्राहकाने अर्ज केल्यापासून प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्पर सेवा द्यावी. काही अडचणी आल्यास त्यासंबंधी ग्राहकांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

या कार्यशाळेत डॉ. संतोष पाटणी यांनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया आणि डॉ. नीलेश रोहणकर यांनी सौर धोरण या विषयावर इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत उपविभाग कार्यालयप्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, सहायक अभियंते व कनिष्ठ अभियंते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.