Pune : मुलींच्या व्हेरॉक कप 2023 स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकॅडमी व ए के स्पोर्ट्स अकॅडमी विजयी

एमपीसी न्यूज – आज झालेल्या साखळी सामन्यात 19 वर्षाखालील मुलींच्या व्हेरॉक कप 2023 स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकॅडमी (Pune ) व ए.के. स्पोर्ट्स अकॅडमी हे दोन संघ विजयी ठरले आहेत. पहिला सामना आर्यन्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध स्कोअर स्पोर्ट्स अचिव्हर यांच्यात रंगला. यामध्ये आर्यन्स क्रिकेट अकॅडमीने 29 धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना आर्यन्सच्या संघाने 151 धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये अवंती तुपे हिने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना अचिव्हरच्या संघाने 122 धावाच केल्या. ऋतूजा देसाई हिने 58 धावा काढत एकाकी झुंज दिली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यास ती अपयशी ठरली. या सामन्यात आर्यन्स क्रिकेट अकॅडमीची अवंती तुपे ही सामना वीरांगना ठरली.

Pune Metro : येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन; विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोची फिडर सेवा

ए के स्पोर्ट्स अकॅडमीने कोहिनूर ग्रुप इलेव्हनच्या संघावर 22 धावांनी मात दिली. या सामन्यात 4 विकेट्स मिळवणारी सृष्टी भांगे सामना वीरांगना ठरली. ए के स्पोर्ट्स अकॅडमीने तन्वी गुप्ते 72 धावा आणि प्रांजली पिसे 46 धावा यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर 140 धावांचे आव्हान (Pune) कोहिनूर समोर ठेवले. प्रत्युत्तरात कोहीनुरला 118 धावांवर रोखण्यात ए के स्पोर्ट्स ला यश आले.  या सामन्यात 4 विकेट्स मिळवणारी सृष्टी भांगे सामना वीरांगना ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.