Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मंगळवारी ब्लॉक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या (Express Way) यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मंगळवारी (दि. 12) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव किलोमीटर 56/900 व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ किलोमीटर 74/900 येथे पुणे वाहिनीवर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत या लांबीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार आहेत.

Pune : मुलींच्या व्हेरॉक कप 2023 स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट अकॅडमी व ए के स्पोर्ट्स अकॅडमी विजयी

तसेच गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी दोन वाजता द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी (Express Way) वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.