PCMC : आकाशचिन्ह विभाग उपायुक्त खोत यांच्याकडे, भूमि जिंदगी शिंदे यांच्याकडे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभाग आणि कामगार कल्याण विभागाची ( PCMC) अतिरिक्त जबाबदारी पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे तर  भूमि आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण विभागाची अतिरिक्त जबाबदारी निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Pune Metro : येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन; विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोची फिडर सेवा

आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांची ग्रामविकास विभागात उपसचिव म्हणून बदली झाली आहे. तर, भूमि आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची तळेगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. पण, त्यांच्या नियुक्तीला मॅटने स्थगिती दिली आहे.

त्यामुळे त्यांची नव्याने पिंपरी महापालिकेत नियुक्ती झाली नाही.  आठ दिवस या विभागाला कोणी प्रमुख नव्हता. त्यामुळे त्या विभागांचे कामकाज ठप्प झाले होते.  आयुक्त शेखर सिंह यांनी त्या चार विभागांसाठी अधिकारी नेमला ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.