Pimpri : नागरिकच म्हणताहेत ….अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा

एमपीसी न्यूज – अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी,  रस्त्यांची अपुरी ( Pimpri) कामे लवकरात कामे पूर्ण करा अशा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत महापालिका प्रशासनाला केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.

Pune Metro : येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन; विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोची फिडर सेवा

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ( Pimpri) नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण 70 तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे 18, 5, 3, 11, 6, 4, 9,  आणि 14 तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे उपस्थित होते.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी (  Pimpri) व सूचना मांडल्या. यामध्ये मुख्यत्वे अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा तसेच रस्त्यांची अपुरी कामे लवकरात कामे पुर्ण करा अशा सूचनांचा समावेश होता.

याव्यतिरिक्त नवीन नळ जोड मिळणेबाबत, ड्रेनेज लाईनची सुविधा करून देणेबाबत, स्ट्रीट लाईट सुविधा देणेबाबत, दिशादर्शक फलक दुरूस्ती करणेबाबत, रस्त्यांचे सुशोभिकरण करणेबाबत तसेच पथ विक्रेता आणि फेरीवाल्यांची अपुर्ण कागदपत्रे स्विकारणेबाबत आणि पदपथांवरील खचलेले ब्लॉक दुरूस्त करणेबाबत तक्रारी नागरिकांनी उपस्थित राहून ( Pimpri) मांडल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.