Pune News : चक्का जाम आंदोलन रिक्षा चालकांना भोवलं, 37 जणांना पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News) याप्रकरणी 37 रिक्षा चालकांसह रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात काल आर टी ओ कार्यालयासमोर रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात चक्का जाम आंदोलन केले होते. (Pune News) संध्याकाळी रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. काही करुन आपल्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून रिक्षाचालकांनी रस्त्यावर रिक्षा लावल्या होत्या.पुण्यातील आरटीओ जवळ वाहतूक कोंडी झाल्यानं लांबच लांब रांग लागल्याचे दिसून आल्या. पोलिसांनी आंदोलन करू नका यासाठी कलम 149 प्रमाणे नोटीस देखील जाहीर केली होती.

Pune News : पुणे बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महामोर्चात खासदार उदयनराजे यांची उपस्थिती, राज्यपालांचा केला निषेध

भारतीय दंडात्मक कलम 143, 145, 147, 149, 188, 336, 353, 342 यासह क्रिमिनल लॉ amendment कायदा कलम 3,7 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1), (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर रिक्षा चालकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.