Pune News : पुणे बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महामोर्चात खासदार उदयनराजे यांची उपस्थिती, राज्यपालांचा केला निषेध

एमपीसी न्यूज  : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले असे असतांना त्यांचा सन्मान व्हावा हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे. मी याआधीही माझी भूमिका मांडली आहे. (Pune News) ज्या प्रमाणे नूपुर शर्मा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली त्याच पद्धतीने शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयन राजे भोसले यांनी केली आहे.राज्यपालांविरोधात पुण्यात बंदची हाक दिली होती. त्यात उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Tathawade News : ताथवडे येथून बुलेट चोरीला, अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

उदयनराजे भोसले म्हणाले, आज मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले. यावरून 350 वर्षानंतरही महराजांबद्दल प्रेम आणि आदर किंचितही कमी झालेला दिसत नाही. ज्या वेळी मी रायगड ला गेलेलो तेव्हा मला वेदना झाल्या. काही फुटकळ आणि विकृत लोक कारण नसतांना विधाने करतात असे म्हणत त्यांनी राज्यपाल आणि आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर निशाण साधला.(Pune News) उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आयुष्य वेचले. आज त्यांच्या सन्मान व्हावा हे सांगण्याची वेळ आली आहे, ही शोकांतिका म्हणावी लागेल. मी याआधी माझी भूमिका मांडलेली आहे. पक्ष हा नंतर चा भाग आहे. ज्या प्रमाणे नूपुर शर्मा यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली, त्याच पद्धतीने महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांविरोधात व्हायला हवी. आज जे पुण्यात आंदोलन झाले, तशीच भावना ही संपूर्ण राज्याची आहे, असे देखील उदयन राजे भोसले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, हा प्रश्न विचारला असता उदयन राजे भोसले यांनी बोलण्याचे टाळले.

या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. सुमारे साडे सात हजार पोलीस मूक मोर्चाच्या मार्गावर तैनात करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.