Tathawade News : ताथवडे येथून बुलेट चोरीला, अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  – वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगाराला बुलेट दुचाकी घेऊन बाहेर नेले. तिथे त्याच्याकडून कामासाठी बुलेट नेऊन ती परत न देता विश्वासघात केला.(Tathawade News) ही घटना सोमवारी (दि.12) सकाळी ताथवडे येथे घडली.

राजेश अरुण जाधव (वय 30, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : भोसरी येथे सात जणांकडून कुटुंबाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ताथवडे येथे वॉशिंग सेंटर आहे. ऋषभ सुनील आंबरे यांनी त्यांची 80 हजारांची बुलेट दुचाकी जाधव यांच्या वॉशिंग सेंटरमध्ये वॉशिंगसाठी दिली होती. सोमवारी सकाळी एक अनोळखी इसम वॉशिंग सेंटरमध्ये आला.(Tathawade News) कामगार अमोल भाट आणि आदित्य राठोड यांचा विश्वास संपादन करून वाकड ब्रिजवरून त्याची कार वॉशिंगसाठी आणण्याच्या बहाण्याने आदित्य राठोड याला बुलेट दुचाकी घेऊन जाण्यास भाग पाडले. वाकड ब्रिजवर गेल्यानंतर आरोपीने त्याच्या वडिलांना घेऊन येतो म्हणून आदित्यला तिथेच सोडून बुलेट नेली. ती परत आणून न देता विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.