Bhosari News : भोसरी येथे सात जणांकडून कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून मुलगा आणि त्याच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. (Bhosari News) ही घटना सोमवारी (दि.12) रात्री सदगुरुनगर, भोसरी येथे घडली.

अमीन रशीद शेख (वय 25, रा. सदगुरुनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुलतान उर्फ आसिफ शेख, अल्ताफ शेख, त्याची बायको, आई, वडील, मावशी आणि आजीम शेख (सर्व रा. सदगुरुनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुणे बंदमुळे पीएमपीएमएलच्या केवळ 1434 बसेस रस्त्यावर, 10 टक्के बसेस कमी चालवण्याचा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी, त्यांच्या आई आणि वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली.(Bhosari News) यात फिर्यादी आणि त्यांच्या आई वडिलांना दुखापत झाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

o

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.