Pune : ‘भाजप’ने आकसाने गणेशोत्सव कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत -चेतन तुपे

आमदार चेतन तुपे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर भाजप सरकारने आकसाने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरातील गणेशोत्सवाला 125 वर्षांची दैदिप्यमान, वैभवशाली परंपरा आहे. आरे कारशेड विरोधातील आंदोलक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव कार्यकर्यांवरील ही गुन्हे मागे घेण्यात यावे.

पुण्यातील ही गणेशोत्सव मंडळे कार्यकर्ते आणि नेते घडविणारी विद्यापीठे आहेत, असा उल्लेख राजकीय व सामाजिक क्षेत्रात केला जातो. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने पुण्यात संतापाचे वातावरण आहे.

या प्रकारामुळे कार्यकर्त्यांना निष्कारण कोर्टाचे हेलपाटे घालावे लागत आहे. यामध्ये अनेक सुशिक्षित, होतकरू, तरुणांच्या करीअरचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती असल्याचे चेतन तुपे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.