Pune News : अमेरिकेत क्रिकेट संघ मिळवून देण्याचे आमिषाने पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याला लाखो (Pune News) रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. USA Cricket League मध्ये शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे.

मुंबईतील 5 जणांनी मिळून अमेरिकेतील क्रिकेट लीग मध्ये टीम विकत घेऊन देतो यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केला होती. आशिष कांटे (41) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे

याप्रकरणी सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन, विक्रम हुसेन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची “ब्रेनस्टॉर्म” नावाची कंपनी आहे. आरोपी आणि फिर्यादी कांटे यांची ओळख झाली आणि यु एस ए (USA) क्रिकेट लीग बद्दल चर्चा झाली होती.(Pune News) या सर्व आरोपींनी यु एस ए क्रिकेट कौन्सिलकडे 20-20 क्रिकेट प्रकारात संघ मिळवून देतो तसेच क्रिकेट लीग मधील 40 टक्के शेअर्स मिळवून देतो असे आमिष दाखवत कांटे यांच्याकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली.

Pune News : विद्या व्हॅलीच्या विजयात सिद्धार्थचे चार गोल

या अमिषाला बळी पडून कांटे यांनी यासंबंधी “ना हरकत प्रमाणपत्र” घेण्यासाठी 55 लाख रुपये देखील दिले होते. हे प्रमाणपत्र आण्यासाठी कांटे यांनी अमेरिकेची वारी देखील केली होती. मात्र प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कांटे यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवी चे उत्तर द्यायला सुरुवात केली. आपली या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिस स्टेशन गाठले

हा सगळा प्रकार जानेवारी 2019 पासून सुरु होता.(Pune News) आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 34, 406, 420 अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.