Pune: अखेर पुणे- सोलापूर रस्त्यावरील चुकीचा बीआरटी बीम काढण्याच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे- सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात चुकीचा बीआरटी बीम काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा बीम काढल्यानंतर पुणे- सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी माहिती दिली. ” हा बीम काढून टाकण्याची मागणी मागील पावणेदोन वर्षांपासून केली जात होती. पुणे महापालिका, वाहतुक शाखा यांच्याशी सततचा पाठपुरावा केला जात होता. मंगळवारी (दि. २५) रात्री १२ वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत ५०० मीटरचा बिम काढून टाकण्यात आला आहे. पुढील काम दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे”

पुणे महापालिकेचे अभियंता शेवते, कनिष्ठ अभियंता कामठे, वाहतुक शाखा पोलिस निरिक्षक विभांडिंक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. रस्ता रुंदीकरण, फूटपाथ कडेला घेणे, सर्व्हिस रोड काढून टाकणे, सायकल ट्रॅक करणे अशी कामे केल्यानंतर पुणे- सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते असा विश्वास योगेश ससाणे यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.