Pune : इंजिनीयर दाम्पत्याच्या घरात 10.33 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोहगाव येथील (Pune) पवार वस्ती परिसरात चोरट्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर दाम्पत्याच्या घरात 10.33 लाख रुपयांची घरफोडी केली आहे. ही घरफोडी 27 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. गावी गेलेल्या दाम्पत्याला शेजाऱ्यांनी चोरी बाबत माहिती सांगताच दाम्पत्य गुरुवारी (दि.2) घरी परतले व त्यांनी पोलीस ठाण्यात याबबत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये रो-हाऊस सोसायटीच्या मागे असलेल्या एका शेतातून तीन व्यक्ती, फिर्यादीच्या घरामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कंपाऊंडची मागील भिंत चढून आत आल्याचे दिसून आले.

धारदार शस्त्रे घेऊन आलेल्या त्या चोरट्यांनी मुख्य दरवाजा आणि सुरक्षा गेटचे कुलूप हत्याराने तोडले. आत गेल्यावर, त्यांनी पहिल्या मजल्यावरील एका लाकडी कपाटाला लक्ष्य केले.

Pimpri : राममंदिर लोकार्पणाच्या अक्षता घरोघरी देणार

दागिन्यांनी भरलेली पिशवी बाहेर काढून ती बाहेर फेकली व आरोपी पसार झाले. फिर्यादी हे बिहारमध्ये मूळ गावी गेले होते. (Pune) घरफोडी झाल्याबद्दल शेजाऱ्याचा फोन आल्यानंतर हे जोडपे गुरुवारी पुण्याला परतले.

लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.