Pune Bus Accident : दौंड तालुक्यातील बस अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Bus Accident) झालेल्या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव येथे घडला आहे.

भांडगाव येथे ट्रक आणि बसचा अपघात झाला. यामध्ये पोलीस नाईक नितीन दिलीप शिंदे (वय 36 वर्षे) यांचा मृत्यू झाला. शिंदे हे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या या अपघाताने पोलीस स्टेशनमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Budget 2022 : मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – श्रीरंग बारणे

नितीन शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे खाजगी बसने यायला निघाले (Pune Bus Accident) होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड जवळ हा अपघात झाला. अपघात ग्रस्त खासगी बस ही सोलापूर हून पुण्याच्या दिशेने जात होती. बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. दरम्यान भरधाव वेगात असणारी बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.