Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण ; राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस साजरा 

50 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव च्या घोषणा 

एमपीसी न्यूज – ठाकरे गटाच्या 50 आमदारांना सोबत घेऊन (Pune) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलेल्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली गद्दार दिवस साजरा करण्यात आला.

50 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यावेळी देण्यात आल्या.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,देशातील जनतेने आज पर्यंतच्या 75 वर्षाच्या काळात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत.पण एक वर्षापूर्वी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे हे 50 आमदारसह बाहेर पडत बंड पुकारले.

Bhosari : वसुधैव कुटुम्बकमचा सिद्धांत समोर ठेवत संत निरंकारी मिशन साजरा करणार आंतरराष्ट्रीय योग दिन

त्यानंतर सूरत,गुवाहाटी आणि गोवा मार्गे पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन केले.त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले आहे.हे बंड देशातील जनता कधीच विसरू शकणार नसून या बंडखोर आमदारांना 50 खोके दिल्याची चर्चा आहे.

त्या घटनेचा आणि कृतीचा आम्ही अनोख्या प्रकारे निषेध नोंदवित आहे.तो म्हणजे गद्दार दिवस साजरा करित असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदार, आमदारांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी (Pune) मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.