Pune : दिव्यांग मुलांनी ही घेतला आईसक्रीम पार्टीचा आनंद

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, वारजे एक (Pune ) अनोखा उपक्रम राबवला ज्यामध्ये त्यांनी दिव्यांग मुलांना खास आइस्क्रीम पार्टी दिली.ज्याचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला.

यावेळी,आजच्या या कार्यक्रमाला पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, जिल्हा उपाध्यक्ष (महिला आघाडी)  शिल्पा महाजनी, जिल्हा सरचिटणीस विकास  अभ्यंकर, शाखा अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, शाखा अध्यक्ष (महिला आघाडी) शैला सोमण, उपाध्यक्ष हेमंत कासखेडीकर, जयश्री कासखेडीकर, सविता राजाज्ञ, अपर्णा कुलकर्णी, अपर्णा कुंतूरकर, अभिनव पाठक, दत्तात्रय देशपांडे, दयाकर दाबके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 प्रा. फौंडेशन जी गेली अनेक वर्षे दिव्यांग, स्पेशल मुलांसाठी काम करते. प्रतिकूल परिस्थितीत देखील या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलाय. दिवाळी किंवा सणांच्या काळात पणत्या बनवणे, रंगवणे याशिवाय कापूर तयार करुन त्याचे आउटलेट मार्फत विक्रीसाठी ठेवतात.

Marunji : दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक

वारजे शाखेच्या वतीने या मुलांसाठी आईस्क्रिम पार्टी चे आयोजन केले होते, पन्नास ते साठ मुलांचा सहभाग  असलेल्या कार्यक्रमात मुलांनी मनसोक्त आईस्क्रीम पार्टी चा आनंद लुटला, सकाळपासून आपल्याला आज आईस्क्रीम मिळणार याची असलेली प्रतीक्षा व मिळाल्यानंतर चा ओसंडून वाहत असलेला चेहऱ्यावरचा आनंद न मोजता येणारा होता.

शाखेच्या वतीने, सर्व मुलांना आवश्यक वैद्यकीय साहित्य देण्यात आले.संस्थेच्या मुख्य संचालिका डॉ प्राजक्ता कोळपकर यांनी मुलांबद्दलच्या सांगितलेल्या घटनांनी उपस्थित गहिवरून (Pune ) गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.