Pune Collector Order: कोरोना नियंत्रणासाठी सोसायट्यांनी सदस्यांवर स्वतःची बंधने लादू नयेत – जिल्हाधिकारी

Pune Collector Order: Housing Societies should not impose their own restrictions on members to Control Corona virus - Collector आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (हौसिंग सोसायटी) आणि इतर गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची बंधने न लादता शासनाच्या, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (बुधवारी) दिले.

आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सोसायटीमधील कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत आल्यानंतर त्यांच्यावर, त्यांच्या नातेवाईक, केअर टेकर यांच्यावर बहिष्कार टाकू नये, सोसायट्यामधील  अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचारी यांना योग्य पद्धतीने वागणूक देण्यात यावी, त्यांना कर्तव्यावर येणे – जाणे करिता प्रतिबंध करू नये, सोसायटीमधील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या, व्यक्ती, संस्था, प्लंम्बर, इलेक्ट्रिशियन, गॅस आणि पाणी पुरवठा करणाऱ्या व्यक्तीना येणे- जाणेसाठी प्रतिबंध करू नये, आशा अनेक महत्वपूर्ण सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात बजावल्या आहेत.

कोरोनाच्या संकट काळात सोसायट्यांकडून स्वतःचे बंधने लादण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश महत्वपूर्ण मानला जात आहे.

वास्तविक पाहता गृहनिर्माण संस्था ( हौसिंग सोसायटी) यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्क लावणे, निरजूंकीकरण करणे, सॅनिटायजर वापर करणे, साबणाने हात धुणे, जेष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांची काळजी घेणे, सामाजिक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे, आशा बाबींवर जनजागृती करून सोसायटीमध्ये आशा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.