Pune : लहान छिद्रातून झाली हृदयाची जटील शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – रुग्णावर दोन वेळा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया (Pune) झाल्या होत्या. तरीही हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये अडथळा (ब्लॉकेज) निर्माण झाला. त्यामुळे करावी लागणारी कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी देखील रुग्णावर झाली. ही शस्त्रक्रिया अवघ्या एका लहान छीद्राद्वारे करण्यात आली. मिनिमल इनव्हेसिव्ह प्रकारच्या या शस्त्रक्रियेमुळे हृदयाच्या उपचारात नवीन पद्धती विकसित झाली आहे.

पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ही मिनिमल इनव्हेसिव्ह शस्त्रक्रिया पार पडली. एका 52 वर्षीय रुग्णावर यापूर्वी दोन अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने वारंवार हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये अडथळा (ब्लॉकेज) निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजेच कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी करणे आवश्यक होते.

Alandi : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस्‌ असोसिएशनतर्फे अन्नदान व फराळाचे वाटप

ही शस्त्रक्रिया, एक मिनिमली इनवेसिव्ह (छोटे छिद्र करून केलेली शस्त्रक्रिया) कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया (CABG) आहे. हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्मृती हिंडारिया यांनी शस्त्रक्रियेचे नियोजन केले. अत्याधुनिक उपकरणे, ‘ऑक्टोपस’ आणि ‘स्टारफिश’ हार्ट स्टॅबिलायझर्स वापरून जिवंत ह्रदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी या शस्त्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली.

हृदय शल्यचिकित्सक डॉ. स्मृती हिंडारिया म्हणाल्या, या शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रगत तंत्रामुळे छोट्या छिद्राद्वारे जिवंत हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात मदत होऊ शकते. वैशिठ्य म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या पाच दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात (Pune) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.