Alandi : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस्‌ असोसिएशनतर्फे अन्नदान व फराळाचे वाटप

एमपीसी न्यूज – दिवाळीचा सण सर्वांना आनंदात आणि उत्साहात ( Alandi ) साजरा करता यावा, यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस्‌ असोसिएशनने आळंदी येथील श्री माऊलीकृपा ज्ञानदान अन्नदान संस्था बालग्रह येथे अन्नदान व फराळाचे वाटप केले.

या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, महिला सचिव ॲड. वर्षा कांबळे, सदस्य ॲड. जयेश वाकचौरे, तसेच ॲड. बी. के. कांबळे, ॲड. अरुण खरात, ॲड. नितीन तिडके, ॲड. कुलदीप बकाल, ॲड. नारायण थोरात, ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड. राकेश जैद, ॲड. रोहित भोसले उपस्थित होते.

Bhosari : मुंबईतील दुकानदाराच्या सांगण्यावरून त्याने चोरले 15 लाखांचे मोबाईल

यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे म्हणाल्या, नवनियुक्‍त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निश्‍चय केला असून त्या अनुषंगाने या सामाजिक उपक्रमाने सुरुवात केली आहे.

येथे येऊन चिमुकल्यांसोबत आम्ही दिवाळी साजरी केल्याने आमची दिवाळीही आनंददायी व समाधानकारक झाली आहे. भविष्यातही ॲडव्होकेट असोसिएशन अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करणार ( Alandi ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.