Pune Corona News: सभागृह नेते धीरज घाटे, स्वीकृत सदस्य गणेश बिडकर, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर या तिघांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर आणि नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर या तिघांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

‘माझी प्रकृती ठीक आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करावी आणि विलगीकरण करावे,’ असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत असतात. त्यामधूनच या नगरसेवकांना कोरोनाची लागण होत आहे.

यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यासह नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी वेळीच उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सभागृह नेते घाटे यांच्या कुटुंबातील एकूण 12 सदस्य कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. तर खराडी-चंदननगरचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव व त्यांच्या कुटुंबातील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह असलयाची माहिती देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्या नंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.

कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नगरसेवक अजय खेडेकर, दीपक पोटे, आनंद रिठे, बाबुराव चांदेरे यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. तसेच उपायुक्त विलास कानडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like