Pune : कोरोनाबाधित महिलेने दिला सदृढ जुळ्यांना जन्म

Coronated woman gave birth to strong twins : या दोन्ही जुळ्या बाळांची प्रकृती उत्तम आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमध्ये भवानी पेठ परिसरातील एका कोरोनाबाधित महिलेने सदृढ जुळ्यांना जन्म दिला आहे.  या दोन्ही जुळ्या बाळांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

या महिलेची यशस्वीपणे प्रसूती करणाऱ्या डॉ. रोकडे, डॉ. चोपडे, डॉ. अग्रवाल, डॉ. आरती, डॉ. अनिता भोसले, डॉ. सृजन आणि एस. एन. चौरे यांचे महापौरांनी अभिनंदन केले आहे.

एकीकडे पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असताना ही बातमी पुणेकरांसाठी आशादायक आहे. कोरोनाचे पुणे शहरात 53 हजार 437 रुग्ण झाले आहेत.

33 हजार 938 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मुळे 1 हजार 284 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या शहरात 18 हजार 215 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 927 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 471 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

तर, पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.