MHT-CET : 25 एप्रिल पर्यंत करता येईल एमएचटी-सीईटीच्या अर्जात दुरुस्ती

एमपीसी न्यूज-राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र (MHT-CET ) आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीच्या ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा  उपलब्ध करून दिली आहे. अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 25 एप्रिलची मुदत आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क भरून विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

Pune : कोण कुठे कुठे डोळे मारतात,याबद्दल मला माहिती नाही-अमृता फडणवीस

त्यापैकी काही विद्यार्थ्यांकडून अर्ज करताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या असून, त्या चुकांच्या दुरुस्तीची संधी मिळण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात बदल करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, लिंग आणि स्वाक्षरी यात बदल करता येईल. बदल (MHT-CET ) करण्यासाठी 25 एप्रिलची मुदत देण्यात आल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.