Satyam Jewellers : सत्यम ज्वेलर्सचे 40 व्या वर्षात पदार्पण

एमपीसी न्यूज – आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील (Satyam Jewellers) नामवंत सुवर्णपेढी म्हणजेच सत्यम ज्वेलर्स यांनी नुकतेच 40 व्या वर्षात पदार्पण केले. 40 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात आमदार सौ.उमाताई खापरे, नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, नगरसेविका सौ.शैलजाताई मोरे तसेच नगरसेविका सौ.शर्मिलाताई बाबर आदी उपस्थित होते. 

 

सत्यम ज्वेलर्स हे सोन्याच्या व्यवसायात आहेत, तर त्यांनी लवकरच त्यांच्या ‘सुवर्ण महोत्सवी वर्षात’ पदार्पण करावे आणि पुढेही ग्राहकांना अशीच उत्तम सेवा दयावी अशी भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. आमच्या 40 वर्षांच्या यशाचे खरे शिल्पकार आमचे सन्माननीय ग्राहक आहेत, त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हतं अशी मनमोकळी प्रतिक्रिया या वेळी सत्यम ज्वेलर्स चे संस्थापक  किरणराज चोपडा यांनी बोलून दाखवली. त्यांनी या वेळी सत्यम ज्वेलर्स चे सर्व सेवक वर्गाचेही आभार मानले.

यंदाच्या लग्न समारंभासाठी सुवर्ण खरेदी करताना ग्राहकांचा विचार करून आम्ही एक आगळीवेगळी ऑफर सर्वासाठी देत आहोत, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चक्क 25% सूट. हि सूट कॅश बॅक स्वरूपात असेल आणि हि योजना दि. 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 पर्यंत सुरु असेल अशी माहिती श्री. महावीर चोपडा यांनी दिली.

MHT-CET : 25 एप्रिल पर्यंत करता येईल एमएचटी-सीईटीच्या अर्जात दुरुस्ती

सोन्याच्या भावात सतत होणारी वाढ परंतु लग्नसराई असल्यामुळे सोन्याची खरेदी तर करावी लागणार अश्या महागाईच्या कात्रीत सापडलेल्या आमच्या सर्व ग्राहकांचा तब्बल 25% फायदा होईल आणि 40 वर्षे पूर्तीनिमित्त ही ग्राहकांना आमच्या कडून सप्रेम भेट आहे. आमच्या निगडी, कृष्णानगर व चाकण ह्या तिन्ही शाखांमध्ये हि ऑफर उपलब्ध आहे . ह्या ऑफरद्वारे  पारंपारिक चपलाहार, कोल्हापुरी साज, ठुशी अश्या मराठमोळ्या दागिन्यांच्या बरोबरीनेच आधुनिक दागिन्यांमधील छोटे मंगळसूत्र, नवजात मुला-मुलींचे दागिने ते वधू-वरांचा साखरपुडा किंवा लग्नापर्यंतच्या भरजरी अश्या विविध डिझाइन्समधील दागिने आपण मनसोक्त खरेदी करू शकता.

 

एवढंच नाही तर भारताच्या विविध राज्यांमधली कलात्मकता लक्षात घेऊन पोलकी, जडाऊ, अँटिक, कुंदन, ह्या व अश्या अनेक दागिन्यांची कलाकृतीही (Satyam Jewellers)आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे अशी माहिती श्री दीपक व राहुल चोपडा यांनी दिली.

अधिक माहिती साठी संपर्क

सत्यम ज्वेलर्स –

कोहीनूर आर्केड,मुंबई-पुणे रोड टिळक चौक,

निगडी बसस्टॉपच्या विरुद्ध बाजूला, निगडी

 

संपर्क क्रमांक 8983088880

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.