Pune Crime : जुन्नर हादरलं, भर चौकात भावानेच भावाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील एकनाथवाडी येथे सोमवारी (दि.2) घडली.

गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गावातील मुख्य चौकात झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला व गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे.

प्रकाश नामदेव मनसुख (वय-58) असे मृत भावाचे नाव आहे. जयनाथ सोपान मनसुख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मनसुख यांच्या अंगावर त्यांचाच चुलत भाऊ आरोपी जयनाथ सोपान मनसुख याने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर प्रकाश यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. पण मंगळवारी रात्री उपचारादरम्यान साडेबाराच्या सुमारास प्रकाश मनसुख यांचा मृत्यू झाला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.