Pune Crime : फेसबुक फ्रेंडला घरी बोलावून केला बलात्कार, एकाला अटक

एमपीसी न्यूज – फेसबुक फ्रेंडला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली. पंकज उदावंत (वय 37) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल केल्याचेही समोर आले आहे.

याप्रकरणी एका 34 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 पासून हा प्रकार सुरू होता. आरोपीने 2018 मध्ये पीडितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने तिला भेटण्यासाठी म्हणून पुण्यात बोलावले. पुण्यात आल्यानंतर तिला बहिणीच्या घरी येऊन जात घरात कोणी नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर पुन्हा एकदा ही तरुणी पुण्यात आली असताना आरोपीने तिला घरी घेऊन जात तिच्यावर जबरदस्ती केली. यावेळी त्याने तिचे अश्लील फोटोही काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देते तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

आरोप इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या तरुणीचे अश्लील फोटो तिचा भाऊ आणि आणखी एकाला पाठवले. त्यानंतर या तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.