Pune Crime : बंगल्याच्या दरवाजा उचकटून दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – बंगल्याचा मुख्य दरवाजा कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा उचकटून, त्यावाटे आत प्रवेश करून 35 हजार रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 12 हजार किंमतीचा ऐवज घरफोडी करून नेला आहे.

ही चोरी लोहगाव परिसरात 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी कल्पना हेडावु ( वय 55, रा. खेसे पार्क, लोहगांव, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेडावु यांचा खेसे पार्क, लोहगांव येथील बंगला कुलूप लावून बंद केला होता. दरम्यान 16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा उचकटून, त्यावाटे आत प्रवेश करून 35 हजार रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 12 हजार किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.