Pune Crime News : पाषाण मध्ये 80 वर्षाच्या महिलेचे हात तोंड बांधून दरोडा, चार लाखांचा ऐवज चोरून नेला

एमपीसी न्यूज – पाषाण परिसरात रात्रीच्या सुमारास घरात घुसलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेचे हात आणि तोंड कपड्याने बांधून ठेवत जबरी चोरी केली. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

चोरट्यांनी त्यावेळी घरात असणाऱ्या केअर टेकर ला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि तब्बल सव्वा चार लाखाचे रोख पैसे आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेने याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि केअर टेकर पाषाण येथील पंचवटी सोसायटीत राहतात. बुधवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास चार जणांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. चोरट्यांनी केअर टेकरला जखमी करून ज्येष्ठ महिलेचे हात आणि तोंड कापडाने बांधले.

त्यानंतर चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटातील 25 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लुटून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.