Pune Crime News : महिला अत्याचाराच्या घटना सुरूच, पुण्यात बलात्काराचे दोन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात नव्याने बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातील खडक आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका 26 वर्ष महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 27 वर्षीय तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध होते. याचाच फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी तरुणीला लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी तिचा गर्भपात केला. तसेच वारंवार तिला मारहाण करत तिच्याकडे पैशाची मागणी केली. 2014 पासून हा प्रकार सातत्याने सुरु होता.

_MPC_DIR_MPU_II

आरोपीने फिर्यादी तरुणांकडून वीस लाख रुपये घेतले आणि ते परत दिलेच नाही. फिर्यादी तरुणीने याप्रकरणी तक्रार अर्ज दिल्यानंतर दहा लाख रुपये परत दिले आणि गुन्हा मागे घेण्यास सांगितले. तक्रार अर्ज आल्यानंतर पोलिसांनी दाखल केला आहे. सुरुवातीला खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात 24 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. यातील फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणाने फिर्यादीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. त्याने फिर्यादी तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.