Pune crime News : गाईच्या तुपात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पकडले, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

एमपीसीन्यूज : गाईच्या तुपात भेसळ करून विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 4  लाख 50  हजारांचे 1 हजार 499  किलो भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले आहे.

शिवराज हळमणी (रा. हात्तीकनबस, अक्कलकोट ), असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक आंबेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून गाईचे भेसळयुक्त तूप विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती कर्मचारी राहूल तांबे आणि सचिन पवार यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका महाविद्यालयासमोर आलेल्या टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडील टेम्पोतील गाईच्या तुपात भेसळ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्याशी संपर्वâ साधून माहिती दिली.

त्यानुसार भेसळयुक्त तुपाची खात्री झाल्यानंतर 1 हजार 499 किलो तूप जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, सर्पâराज देशमुख, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.