Pune Crime News : संचारबंदी असतानाही हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी असतानाही चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या एका टोळक्याने हातात तलवारी अन कोयते घेऊन धुमाकूळ घातला. या टोळक्याने काही वाहनांची तोडफोड करत एकावर वार देखील केले.

याप्रकरणी ज्ञानेश्वर साठे (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दूचाकीवरील 5 अनोळखी व्यक्ती व त्यांचे साथीदार यांच्यावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महालेनगर परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी हे आपल्या घरासमोर स्थानिक नागरिकांसोबत गप्पा मारत बसले असताना दुचाकीवरून एक टोळके त्या ठिकाणी आले.

त्यांच्या हातात तलवारी आणि कोयते होते. त्यांनी परिसरात दहशत माजवत एका तरुणावर वार केले. त्यानंतर परिसरात लावण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड करत गोंधळ घातला. तसेच, शिवीगाळ करून नागरिकांच्या मनात भिती भरवली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.