Pimpri Crime News : सराईत गुन्हेगार सचिन सौदाई टोळीवर ‘मोक्का’

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातील सराईत गुन्हेगार सचिन सौदाई आणि त्याच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999) अंतर्गत कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. 11) दिले आहेत.

टोळी प्रमुख सचिन राकेश सौदाई (वय 36, रा. अशोक थिएटर जवळ, पिंपरी), सनी ऊर्फ नितीन राकेश सौदाई, (वय 30, रा. अशोक थिएटर जवळ, पिंपरी), अजय विजय टाक (वय 26, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी), अनिल ऊर्फ बाबा ऊर्फ गो-या सुशिल पिवाल (वय 31, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी), तरुण ऊर्फ मोनु बिपीन टाक (वय 30, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी), जतिन ऊर्फ सोनु मुकेश मेवाती (वय 21, रा. बोपखेल), तौसिफ सय्यद (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सचिन सौदाई आणि त्याच्या टोळीविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, कट रचून दरोडा घालणे, अपहरण, खंडणी मागणे, दुखापत, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे, असे एकूण 15 गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.

हे आरोपी संघटीतपणे गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, मिलिंद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अनिरूध्द सावर्डे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, अनिल गायकवाड, विष्णू भारती, ओंकार बंड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.