Pune Crime News : हप्ता दिला नाही म्हणून कोथरुड येथे किराणा दुकानदारावार चाकुने वार

एमपीसी न्यूज – हप्ता न दिल्याने तिघांनी  किराणा माल दुकानदारावर चाकूने वार केल्याची घटना कोथरूड भागात (Pune Crime News)घडली.

दिलीप चौधरी (वय 32, रा. कोथरूड ) यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरूड भागात दिलीप यांचे तुलसी सुपर शॉपी हे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. रात्री नऊच्या सुमारास दिलीप दुकानात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. फिर्यादींनी नकार दिल्यानंतर आरोपींनी गल्ल्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला.

Pune News : सार्वजनीक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दहा दिवसात पुणे महापालिकेन केला तीन लाखांचा दंड वसूल

त्या वेळी फिर्यांदींनी आरोपींना विरोध केला असता  त्यांच्यावर आरोपीने चाकूने वार केले. दुकानातील स्कॅनिंग यंत्र चोरून चोरटे पसार झाले. कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील (Pune Crime News)तपास करत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.