Pune Crime News : जादा व्याजदराच्या आमिषाने पती-पत्नीला 65 लाखांना गंडा, 34 जणांची फसवणूक

एमपीसीन्यूज : जादा व्याजदर देण्याच्या आमिषाने एकाने पती-पत्नीला तब्बल ६५ लाखांचा गंडा घातला. त्याशिवाय आणखी ३४ जणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. ही घटना नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०२१ कालावधीत घडली.

याप्रकरणी पंकज भागचंद छल्लाणी (रा. मुकुंदनगर, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रिचर्ड अंची (वय ५८, रा. भोसलेनगर )यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी पंकज आणि रिचर्ड यांची मित्राकडून ओळख झाली होती. त्यानंतर पंकजने रिचर्डसह त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादित केला. त्यांना जादा दराने व्याज देण्याच्या आमिषाने गुुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार रिचर्ड यांनी पंकजच्या सांगण्यानुसार ६५ लाखांची गुंंतवणूक केली.

त्यानुसार पंकजने फेब्रुवारी २०१८ पर्यंत त्यांना व्याज दिले. मात्र, मार्च २०१८ पासून व्याज आणि ठेव परत न देता फसवणूक केली. त्याशिवाय पंकजने ३४ नागरिकांना १८ ते २४ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.