Today’s Horoscope 07 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार गुरुवार. …. ​दि​.  07 जानेवारी 2021

  • शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस
  • राहू काळ – दुपारी १.३०  ते ३.००
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – चित्रा १४.४६ पर्यंत नंतर स्वाती.
  • चंद्र राशी – तूळ.

.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग मोरपंखी)

महत्वाच्या चर्चा, वाटाघाटी, विवाह विषयी चर्चा यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. राजकारणी वक्ते मंडळी सभा गाजवतील. वैवाहिक जीवनातील मतभेद आज सामंजस्याने मिटतील.

वृषभ – (शुभ रंग- मोतिया)

आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारी ही दुर्लक्षित करू नका  विवाह जुळवणे विषयी बोलणी उद्यावर ढकला  कोणतेही महत्त्वाचे निर्णय उतावीळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

मिथुन – (शुभ रंग- डाळिंबी)

आज बरेच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहिणी आज पार्लर साठी वेळ काढतील.

कर्क – (शुभ रंग -आकाशी)

आज अधिकारी वर्गाने अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे. आज घरी मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. अनावश्यक लाड नकोत.

सिंह – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात अति व्यस्ततेमुळे कौटुंबिक गरजांकडे दुर्लक्ष होईल. कौटुंबिक सदस्यांची नाराजी पत्करावी लागेल. वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

कन्या – (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्हाला आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्ती ही बळावेल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवलेले बरे. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

तुळ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कुठेही समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक अजिबात करू नका. ज्यात काही कळत नाही त्यात उगाच डोकं घालू नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या कलाने घेतलेले बरे.

वृश्चिक – (शुभ रंग- हिरवा)

आज काही अनपेक्षित मोठे खर्च उद्धवल्यामुळे आर्थिक ओढाताण संभवते. घरात थोर मंडळींशी वैचारिक मतभेद होतील. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.

धनु – (शुभ रंग- पिस्ता)

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. येणी वसूल होतील. उद्योगाची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीने ही आज तुम्ही भारावून जाल.

मकर – (शुभ रंग मरून)

उद्योग धंद्यातील अथक परिश्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. मागणी तसा पुरवठा करावा लागणार आहे.

कुंभ – ( शुभ रंग- क्रीम)

केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे आज हिताचे राहील. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. ज्येष्ठ मंडळींची अध्यात्माकडे रुची वाढेल. गृहिणी आवर्जून दानधर्म करतील.

मीन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखूनच वागणे हिताचे राहील. कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज आवाक्‍याबाहेर कोणतेही धाडस योग्य ठरणार नाही.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.