Pune Crime News : पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सव्वा दोन कोटीचा मुद्दे माल जप्त 

एमपीसी न्यूज – हडपसर पोलिसांनी अवैधरित्या पेट्रोल व डिझेलची (Pune Crime News) चोरी कऱणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून एकूण 24 हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

 

सुनिलकुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कवलु सरोजयांना अटक केली असून  सुनिल रामदास तांबे या पोलीस शोध घेत आहेत. आरोपी हे शिर्डी विमानतळाकडे इंधन घेवून जात असलेल्या टँकरमधून ही चोरी करत होते.

Pune : लोहगड विसापूर विकास मंचाचा सन्मान       

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान हडपसर भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांचे पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला इंधन चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली. नवी मुंबईतील वाशी येथून एटीफ पेट्रोल-डिझेल भरून टँकर शिर्डी विमानतळाकडे निघाले होते.

 इंधन कंपनीकडून टँकरच्या प्रवासाचा मार्ग ठरवण्यात आला. या सोबतच टँकरचा माग घेण्यासातीह विशिष्ट यंत्रणा त्यात बसवण्यात आली होती. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना टँकर मधील इंधनाची चोरी होत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी हडपसर परिसरात छापा टाकला. या छाप्यात टँकरमधून इंधनाची चोरी होत असल्याचे दिसले. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.पोलिसांनी आरोपींकडून 8 पेट्रोलचे टॅकर 14 पेट्रोल क्रन्ड, इलेक्ट्रीक पंप असा ओकूण 2 कोटी 28 लाख 5 हजार 995 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  आरोपी विरोधात हडपसर पोलीस (Pune Crime News) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास सामाजीक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.