IPL 2023 : रोमांचक सामन्यामध्ये कोलकाता चा गुजरात वर विजय; रिंकू सिंगची लक्षवेधी कामगिरी

एमपीसी न्यूज – रविवारी दिनांक 9 एप्रिल रोजी झालेल्या आयपीएल 2023 च्या ‘ हाय स्कोरिंग थ्रिलर ‘ सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स चा गुजरात टायटन्स वर 3 बळी राखून विजय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (IPL 2023) स्टेडियम वर झालेली हा सामना समनाच्या अंतिम चेंडू वर कोलकाता ने जिंकला. गुजरात चांगल्या फॉर्म मध्ये या सामन्यात उतरली होती. नाणेपेक जिंकून गुजरात ने फलंदाजी करायचा निर्णय घेतला.

 

गुजरात चा सलामीवीर रिद्धिमान सहा (17) जरी खेळावर जास्त प्रभाव करू शकला नाही तरी त्याचा जोडीदार शुभमन गिल (39) ने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेला अभिनव मनोहर (14) ही काही जास्त वेळ टिकला नाही. परंतु साई सुदर्शन आणि विजय शंकर च्या उत्तम कामगिरी मुळे गुजरात ची धावसंख्या 200 च्या पार गेली. साई सुदर्शन ने 38 चेंडूंमध्ये 53 धावा काढल्या तर विजय शंकर ने 24 चेंडूनमध्ये 63 धावा काढल्या. कोलकाता कडून सुनील नरेन ने 3 बळी घेतले तर सुयश शर्माने 1 बळी घेतला.

205 या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता चे सलामीवीर अपयशीच ठरले.  रहमानुल्ला गुरबाज आणि नारायण जगदीशन यांनी कोलकाता ला हवी असणारी सुरुवात दिली नाही. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या (IPL 2023) व्यंकटेश अय्यर ने उत्तम कामगिरी करत 40  चेंडूंमध्ये 83 धावा काढल्या. परत कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग च्या खेळी मुळे सामन्याचा शेवटच्या चेंडूवर कोलकाता ने गुजरात ला पराभूत केले. राशिद खान ने 3 बळी घेतले तर अलजारी जोसेफ ने 2 बळी घेतले. मोहम्मद शमी आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या जोशुआ लिटिल ने 1 बळी घेतला. रिंकू सिंग ने शेवटच्या षटकात 5 षटकार मारून सामना कोलकाता ला जिंकवला. मस्त रोमांचक झालेल्या या सामन्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम वर आलेल्या समर्थकांना पैसा वसूल सामना बघण्यास मिळाला.

 

 

काल कोलकाता चा कर्णधार श्रेयस अय्यर आणि गुजरात चा कर्णधार हार्दिक पांड्या हे दोघे बाहेर होते. गुजरात च्या संघाने काल आयपीएल 2023 चा पहिला सामना हरला तर कोलकाता ने स्वतःचा दुसरा सामना जिंकला. दोन्हीही संघ (IPL 2023) चांगले दिसत आहेत तर स्पर्धेमध्ये ते किती पुढे जातात हे बघावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.