_MPC_DIR_MPU_III

Pune Crime News : महिला पोलिसाचा विनयभंग; बदनामीच्या भीतीने पोलीस शिपायाचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसीन्यूज : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आज, मंगळवारी भल्या पहाटे एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्‍न केला होता. यामध्ये दुसराच पोलीस कर्मचारी गोळी लागल्याने जखमी झाला होता. या प्रकरणाला आता भलतेच वळण लागले असून विनयभंग केल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्‍न केल्‍याचे उघड झाले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

मयूर ज्ञानेश्वर सस्ते, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिला पोलीस शिपायाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पोलीस मुख्यालयातील क्वार्टर गेट येथे 20 ऑक्टोबरच्या पहाटे कर्तव्यावर होत्या. त्याच दरम्यान आरोपी पोलीस शिपाई याला कॉर्टर गेट येथे बिगलर म्हणून नेमले होते. पहाटे सव्वातीन ते साडेतीनच्या दरम्यान आरोपीने फिर्यादीचा विनयभंग केला.

_MPC_DIR_MPU_II

परंतु, फिर्यादीने याला विरोध करत आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपीने ‘तुम्ही माझी तक्रार दिली तर जीव देईन’ असे म्हणत तेथील एका कर्मचाऱ्याची रायफल हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी चुकून रायफल ट्रिगर दबला गेल्याने एक राऊंड फायर होऊन गार्ड अमलदार बेंडाळे यांच्या बोटाला गोळी लागली. यामध्ये बेंडाळे यांच्या बोटाला दुखापत झाली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पोलिस शिपायाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिक्षा झडते करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.