Pune Crime News : रवींद्र बऱ्हाटेसह त्याच्या साथीदाराला आसरा देणाऱ्या तिघांना अटक

एमपीसीन्यूज : मोक्काच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांना आसरा देणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शंकर शेमटया वसावे (वय 28, नंदुरबार), संदीप पोपट घाडगे (वय 34) आणि सूरज सिद्धेश्वर गायकवाड (वय 26, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरातील विविध ठिकाणांवरील जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे यांच्यासह 13 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई करून 11 जणांना अटक केली होती. त्यांची माहिती घेतल्यानंतर ते इतक्या दिवस कुठे होते, त्यांना आसरा कोणी दिला, याची माहिती पोलीस गोळा करत होते.

त्यावेळी संबंधितांना तिघांनी मदत केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. मोक्काचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर आसरा देणा-यांना ५ वर्ष कारावास आणि ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.