Pune Crime News : महिलेचा गळा दाबून खून, पती आणि मुलावर पोलिसांना संशय

एमपीसी न्यूज- पुण्यातील उरुळी कांचन परिसरात एका 37 वर्षीय महिलेचा (Pune Crime News) गळा दाबून खून करण्यात आला. राहत्या घरात या महिलेचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या महिलेच्या पतीने आणि मुलानेच हा खूप केला असावा असा संशय पोलिसांना आहे.

तसलीम जमीर शेख (वय 37, माऊली कृपा बिल्डिंग, जय मल्हार रोड, पिराचा चौक, उरुळी कांचन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमूल लक्ष्मणराव घोडके यांनी तक्रार दिली आहे.

Pune Crime News : पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पतीनेही विष पिले; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

अधिक माहिती अशी की, राहत्या घरात तसलीम जमीर शेख या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आणि शरीरावरील बोथट जखमामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.

या महिलेचा खून झाला त्यावेळी घरात तिचा 45 वर्षे पती आणि 18 वर्षे मुलगा दोघेच उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनीच या महिलेचा खून केला असावा असा दाट संशय पोलिसांना आहे. लोणी (Pune Crime News) काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.