Pune Crime News : पहिले लग्न झाल्याचे लपवून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून ठेवत एका 25 वर्षे तरुणीला (Pune Crime News) लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शरीर संबंध ठेवले. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.

याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune Crime News : महिलेचा गळा दाबून खून, पती आणि मुलावर पोलिसांना संशय

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही पुण्याची वारजे परिसरातील आहे. आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवासी आहे. दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने पहिले लग्न झाले असताना सुद्धा ते पिडित तरुणीला माहित होऊ न देता तिला लग्नाचे आम्ही दाखवले.

त्यानंतर तिच्यासोबत पुण्यातील वारजे परिसरात आणि मुंबईतील दर्शन हॉटेलमध्ये वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. यातून पीडित तरुणी ही चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. वारजे पोलिसांनी या प्रकरणी (Pune Crime News) गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.