Pune Crime News : मुलीच्या 9 वर्षीय मैत्रिणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- मुलीच्या नऊ वर्षीय मैत्रिणीसोबत (Pune Crime News) एका 33 वर्षीय नराधमाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पहिले लग्न झाल्याचे लपवून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी वारजे परिसरातील एका उच्चभू सोसायटीत राहतात. फिर्यादी यांची नऊ वर्षाची मुलगी आणि आरोपीची मुलगी मैत्रिणी आहेत. 2 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी मैत्रिणी सोबत खेळण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती.

यावेळी आरोपीने तिला जिन्याजवळ नेऊन तिच्याबरोबर अश्लील चाळे केले. या सर्व प्रकाराने पीडित मुलगी घाबरली आणि तिने या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा (Pune Crime News) दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.