Pune Crime : पॉस्कोच्या गुन्ह्याच्या तक्रारदाराकडून पोलिसाने मागितली 35 हजारांची लाच

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पॉस्कोच्या गुन्ह्यात तक्रारदारालाच आरोपी करू शकतो असे सांगत येरवडा पोलीस उपनिरीक्षकाने 35 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किर्वे यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत येरवडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. पोलीस ठाण्यात पॉस्कोचा गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील तक्रारदार आणि त्यांच्या आईला आरोपी करू शकतो असे सांगत त्यांना भिती दाखवली. त्यांना आरोपी न करण्यासाठी प्रशांतने त्यांना 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये प्रशांत याने तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध आज येरवडा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.