Pune Crime : सासरच्या मंडळीकडून सुनेला आणि आईला घरात घुसून मारहाण

एमपीसी न्यूज – तुमच्या मुलावर केलेल्या उपचाराचे (Pune Crime) साडे तीन लाख रुपये परत करा म्हणत मुलीच्या सासरच्या मंडळींनी सुनेच्या घरात घुसून सुनेला व तिच्या आईला मारहाण व शिवीगाळ केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.27) मोरवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलीच्या सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : ‘निरोप देऊनही भेटण्यासाठी का आला नाहीस’ म्हणत भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई व फिर्यादी या घरी असताना आरोपी आले व त्यांनी फिर्यादीच्या आईला तुमच्या मुलीवर दवाखान्यात उपचारासाठी केलेल्या खर्चाचे 3 लाख रुपये द्या म्हटले, यावेळी फिर्यादीच्या आईने जावयाच्या अनैतिक संबंधाबद्दल विचारणा केली असता फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच लहान भावाचा साखरपुडा कसे करते? त्याला जिवंत (Pune Crime) ठेवणार नाही अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.