Pune Crime : कांद्याच्या 58 गोण्या चोरणारे तरुण अटकेत, मामाच्या गावात लपवून ठेवलेला कांदाही जप्त

एमपीसी न्यूज – कांद्याच्या बराखीचे कुलूप तोडून 58 गोण्या कांदा चोरून नेणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.आरोपींनी चोरलेला कांदा मामाच्या गावात लपून ठेवला होता. हा सर्व कांदा पोलिसांनी जप्त केला आहे. ओतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केतन सुधीर हांडे (वय 21), अक्षय देवराम सदाकाळ (वय 23), सौरभ सुभाष मस्कारे (वय 19) आणि विक्रम सखाराम गोडे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी वरद विष्‍णू देसाई (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यात फिर्यादी यांची कांद्याची बराख आहे. 21 ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी या बराखीचे कुलूप तोडून 58 गोणी कांदा चोरून नेला होता. या प्रकरणी पोलिस ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास सुरू असताना पोलिसांना कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन संशयित चोरटे दिसले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन मित्रांच्या मदतीने कांदे चोरल्याची कबुली दिली. चौघांनाही अटक केली असून त्यांनी भोइरवाडी येथे मामाच्या गावात लपवलेला कांदा आणि एक पीकअप असा सहा लाख 98 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III