Pune : श्री चतुःश्रुंगी देवस्थानचे पुजारी देवदत्त अनगळ यांचे निधन

एमपीसी न्यूज : श्री चतुःश्रुंगी देवस्थानचे पुजारी (Pune) आणि माजी विश्वस्त देवदत्त (उर्फ बाबा) गोपाळ अनगळ यांचे वयाच्या 83 व्या वर्षी रविवारी (23 एप्रिल) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

महाराष्ट्र नाणकशास्त्र परिषदेचे कार्यवाह म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पाहिले. दुर्मिळ नाणी, नोटा आणि मूर्तींचा संग्रह त्यांनी केला होता. देश विदेशातील गणेशाच्या मूर्तींचे वैशिष्ट्यपूर्ण संकलन त्यांच्याकडे होते. जगभरात त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते.

Pune : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल – दीपक केसरकर

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा (Pune) परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.