Pune : शिवाजीनगर पोलिसांनी 9 लाख 50 हजार रुपयांचे चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना केले परत

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने 9 लाख 50 हजार रुपयांचे 51 मोबाईल नागरिकांना परत केले आहेत.(Pune) याबद्दल नोगरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.हे मोबाईल पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून हस्तगत केले आहेत.यामध्ये उत्तर भारत, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता.

 

पोलिसांनी हे चोरीला गेलेले फोन वापरकर्ते व संबंधीत पोलीस ठाणे अंमलदार आदेश चलवादी यांनी त्यांना येत असलेल्या वेगवेगळ्या भाषांचा वापर करत अत्यंत कौशल्याने शोधून काढले. यात विविध महागड्या कंपन्याचे 9 लाख 50 हजार रुपयांचे 51 फोन होते. यासाठी पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलसचा डेटा तयार केला होता. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.

 

Pune : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल – दीपक केसरकर

 

यावेळी नागरिकांनी हरवलेल्या फोनची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांच्या वेबसाईटला(Pune) तसेच शासनाच्या Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.