Nigdi : टपरीला जागा देण्यास टाळाटाळ, प्रहारचे जनसंवाद सभेत आंदोलन

एमपीसी न्यूज – भक्ती-शक्ती चौकातील (Nigdi) एका अपंगाची उड्डाणपूलासाठी हटविण्यात आलेल्या टपरीसाठी निगडीतील पुलाखाली जागा देण्याचे मान्य करून जागा न दिल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आज (सोमवारी) अ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत आंदोलन करण्यात आले.

भक्ती-शक्ती चौकात राजेंद्र वाकचौरे यांची टपरी होती. मात्र, उड्डाणपूलाच्या कामासाठी त्यांची टपरी 2018 मध्ये हटविण्यात आली. तसेच निगडीतील पुलाखाली टपीरासाठी जागा देण्याचे जनसंवाद सभेत पालिकेने मान्य केले होते. मात्र, आता अ क्षेत्रीय अधिकारी सुचित्रा पानसरे यांनी जनसंवाद सभेमध्ये घेतलेले निर्णय आम्हाला लागू होत नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जनसंवाद सभेमध्ये घुसून सभेचे समन्वयक उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्यासमोर आंदोलन केले.

Pune : शिवाजीनगर पोलिसांनी 9 लाख 50 हजार रुपयांचे चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना केले परत

या आंदोलनात शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष (Nigdi) राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्षा संगीता जोशी, लता दुराफे, ज्ञानदेव नारखेडे, अशोक भोपळे, रामचंद्र तांबे, राजाराम पाटील, प्रशांत नागे आदी अपंग बांधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.