MPC News Special : अक्षय तृतीया निमित्त पिंपरी-चिंचवडकरांनी केली एक हजार 150 वाहनांची खरेदी

एमपीसी न्यूज – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया निमित्त वाहन खरेदीला अनेकजण पसंती देतात. या दिवशी खरेदी केलेल्या वाहनातून होणारा प्रवास चांगला होतो, (MPC News Special) अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळे अक्षय तृतीया सणाच्या दिवशी वाहन बुक करणे अथवा वाहन घरी आणून त्याची पूजा केली जाते.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागात अक्षय तृतीया निमित्त एक हजार 150 वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये कार आणि दुचाकींची खरेदी अधिक आहे. दुचाकीच्या तुलनेत चारचाकी वाहनांच्या खरेदीचा आकडा मोठा आहे. रुग्णवाहिका, क्रेन यांचीही खरेदी झालेली आहे.

Nigdi : टपरीला जागा देण्यास टाळाटाळ, प्रहारचे जनसंवाद सभेत आंदोलन

अक्षय तृतीया निमित्त 501 दुचाकी तर 511 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांना पिंपरी-चिंचवडकरांनी अधिक पसंती दिली आहे.(MPC News Special) अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर वाहनाच्या रूपाने लक्ष्मी घरी आणणे असे मानले जाते. त्यानुसारच अनेकांची काही दिवस अगोदरच लगबग सुरु असते.

पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “अक्षय तृतीया निमित्त अनेकजण वाहनांची खरेदी करतात. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे परिवहन विभागाने देखील नियोजन केले होते.”

अक्षय तृतीया निमित्त पिंपरी-चिंचवड आरटीओ मध्ये नोंदणी झालेली वाहने
अडाप्टेड व्हेहिकल – 3
ट्रॅक्टर – 12
रुग्णवाहिका – 3
कृषी वाहन – 2
बस – 7
क्रेन – 6
जेसीबी, पोकलेन – 2
मालवाहतूक – 55
दुचाकी – 501
कॅब – 38
कार – 511
तीनचाकी मालवाहू – 1
तीनचाकी प्रवासी – 9

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.